आधार मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:43+5:302021-08-28T04:18:43+5:30
सिन्नर : भारतीय डाक विभागाच्या आधारकार्डला मोबाइल क्रमांक जोडणीच्या मोहिमेने वेग घेतला आहे. सोमवार (दि. २३) पासून राज्यभर डाक ...

आधार मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सिन्नर : भारतीय डाक विभागाच्या आधारकार्डला मोबाइल क्रमांक जोडणीच्या मोहिमेने वेग घेतला आहे. सोमवार (दि. २३) पासून राज्यभर डाक विभागाच्या डाकपाल, पोस्टमन व कर्मचाऱ्यांकडून सदर मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शुक्रवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीत मालेगाव विभाग राज्यात पहिला तर नाशिक विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होते, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन आहेरराव व सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. ‘आधार’ला मोबाईल लिंक करण्याची डाक विभागाची विशेष मोहीम
‘आधार’ला मोबाईल लिंक करण्याची विशेष मोहीम आठवडाभर सुरू राहणार आहे. नाशिक डाक विभागाने पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व डाक कार्यालयांतून आधारला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरपोच आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी सुविधा नाशिक विभागात सुरू आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत मालेगाव विभागाने २१०० तर नाशिक विभागाने ६०० नागरिकांचे मोबाईल क्रमांक आधारला लिंक केले असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. शनिवारी या आधार जोडणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
---------------------
सिन्नरसह वावी, नांदूरशिंगोटे, मुसळगाव येथे शिबिरे
सिन्नर शहरात सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट मास्तर नीलेश कपिले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसस्थानक, तहसील कार्यालय, सुर्योदय संकुल आदींसह पोस्ट कार्यालयासमोर आधार मोबाईल जोडणीचे शिबिर घेतले. वावी येथे सब पोस्टमास्तर मनिषा लोणकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिबिर घेतले. नांदूरशिंगोटे, मुसळगाव आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी सदर शिबिरे राबविण्यात आली.
---------------
सिन्नर येथे आधारकार्डला मोबाईल क्रमांक जोडणी शिबिराप्रसंगी उपस्थितीत नागरिक. समवेत सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील, नीलेश कपिले, मनोज निरगुडे, बाळासाहेब दराडे यांच्यासह कर्मचारी. (२७ सिन्नर ४)
270821\27nsk_17_27082021_13.jpg
२७ सिन्नर ४