विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
By Admin | Updated: January 20, 2017 22:59 IST2017-01-20T22:59:03+5:302017-01-20T22:59:36+5:30
उपक्रम : माणकेश्वर वाचनालयात रानडे वक्तृत्व स्पर्धा

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. दत्ता उगावकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, ना. भा. ठाकरे, राजेंद्र खालकर, प्रवीण ठाकरे, सुजाता तनपुरे, तन्वीर राजे, सुनील निकाळे, आदि उपस्थित होते. निफाड नगरपंचयतीच्या बांधकाम समितीच्या सभापतिपदी नयना निकाळे यांची निवड झाल्याबद्दल वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर गणपत मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. हरीश आडके उपस्थित होते. स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बी. एस. सूर्यवंशी, संदीप वाघ व जयश्री सोनवणे यांनी काम पाहिले वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कुमावत यांनी आभार मानले. याप्रसंगी निफाड नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक रामनाथ सानप, वाचनालयाचे माजी अध्यक्ष ना. भा. ठाकरे, चिटणीस दत्ता उगावकर, संचालक प्रवीण ठाकरे, बाळासाहेब कापसे, राहुल दवते, सुजाता तनपुरे, मालती वाघावकर,
डॉ मेघा जंगम, संपत धारराव, सुनील सोनवणे, योगीता ठोके, माधुरी डरंगे, ज्ञानेश्वर वडघुले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)