शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:13 IST

नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.

ठळक मुद्देजगरहाटी थबकली : सारे कसे शांत शांत; गावोगावी जनता कर्फ्यू मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.रस्त्या-रस्त्यांवर पसरलेला सन्नाटा कोरोनाच्या भयावहतेची जाणीव करून देत होता. ‘गो कोरोना’ म्हणतानाच या जीवघेण्या विषाणूला हटविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतांपासून ते कायदा-सुव्यवस्था राखणाºया पोलिसांपर्यंत साऱ्यांचेच नागरिकांनी आपल्या घरी-दारी टाळ्यांचा गजर तसेच थाळीनाद करून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत जिल्हावासीयांनी संकटात सापडलेल्या देशाला यानिमित्ताने एकात्मतेचाही संदेश दिला. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. या जीवघेण्या विषाणूचे भारतात संक्रमण होऊ नये, याकरिता शासनस्तरावर युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत.हवापालटसाठी आलेल्यांचा काढता पाय१ त्र्यंबकेश्वर : भीतीपोटी एकदा संशयाचे भूत एखाद्याच्या डोक्यावर बसले तर काय केले जाईल ते सांगता येत नाही. हे भूत संपूर्ण गावाच्याच डोक्यावर बसल्यावर तर विचारूच नका. संपूर्ण गाव एक झाल्याने एका निरोगी कुटुंबावर गाव सोडून पळ काढण्याची वेळ आली.२ त्र्यंबकेश्वरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ब्राह्मणवाडे गाव आहे. या गावात पुणे येथील एका कुटुंबाने जागा घेऊन घर बांधले आहे. ब्राह्मणवाडे येथे या कुटुंबापैकी एक महिला राहते. घर बांधण्याचा हेतू एकच होता, कधी काळी उन्हाळ्यात अगर हवापाणी बदलासाठी येऊन राहणे. ३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एक कुटुंब हवापालटसाठी ब्राह्मणवाडे येथे आले. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी त्यांना येथे राहण्यास विरोध केला. सरपंच पांडुरंग कोरडे आणि अन्य सहकाºयांनी या कुटुंबाला तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घ्या असे सुनावले. साफसफाई अन् सर्व्हिस स्टेशन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्याने अनेकांनी घरातील साफसफाईवर भर दिला तर कुणी आपली वाहने पाण्याने धूवून काढत पार्किंगला सर्व्हिस स्टेशनचे स्वरूप आणले. एरव्ही व्यस्त शेड्यूलमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांचाही निपटरा करण्याला पसंती देण्यात आली. वेळ घालविण्यासाठी कुणी वाचनानंद मिळविला, तर कुणी गृहिणींना स्वयंपाकात मदत करून हातभार लावला. कोरोनाच्या निमित्ताने एक ा वेगळ्या अनुभूतीला नागरिक सामोरे गेले. गप्पांचा पार सुनासुना...गप्पांचे फड रंगणारे पार-कट्टे सुने सुने झाले. दुकानांचे शटर्स उघडलेच नाहीत. घराघरांमध्ये आतून कड्या लागल्या गेल्या. निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांवरील स्मशान शांतता जीवघेण्या कोरोनाची भयावहता अधोरेखित करीत होती.नागरिकांकडून घंटानाद;टाळ्या वाजवून आभारबच्चे कंपनीने घरातच बुद्धिबळाचे पट मांडत, कॅरमच्या सोंगट्यांशी खेळत, पत्त्यांचा डाव मांडत दिवस घालविला. दिवसभर वृत्तवाहिन्यांवरून अपडेट घेत आप्तस्वकीय, नातेवाइकांची मोबाइलवरून विचारपूस करून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात होता. या अभूतपूर्व बंदमध्ये गावोगावी अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांपासून ते प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांकडून आरोग्यसेवा कार्यरत होती. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार, सायंकाळी अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरात, गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात येऊन टाळ्या वाजवत, घंटानाद-थाळीनाद करून कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावणाºयांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या