नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा सचिव असल्याचे सांगत एका तोतयाने ओळखपत्र न देता हॉटेलमालकाकडून जबरदस्तीने रूम बुक केल्याची तसेच पोलिसांनाही धमकावल्याची घटना रविवारी (दि़२) ठक्कर बाजारमधील सह्याद्री हॉटेलमध्ये घडली़ याप्रकरणी संशयित संदीप नरोत्तम पाटील (३५, रा़ पखालरोड, नाशिक) या तोतया सचिवास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पाटील हा हॉटेलमध्ये आला व त्याने ओळखपत्र न देता पालकमंत्र्यांचा सचिव असल्याचे सांगत बळजबरीने हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद करून रूम ताब्यात घेतली़ यानंतर काही वेळाने पुन्हा आला व पैसे परत देण्याची मागणी केली. हॉटेलचे संचालक पानमंद यांच्या अपंगत्वावर अपमानजनक शेरेबाजी केली़ अखेर पानमंद यांनी पोलिसांकडे तक्रार करून बोलावले असता पोलिसांनाही पाटील याने सचिव असल्याचे खोटे सांगितले़ यानंतर हॉटेलमालकाने चौकशी केल्यानंतर हा तोतया सचिव असल्याचे समोर आले़
पालकमंत्र्यांच्या तोतया सचिवाने धमकावले
By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST