ब्रह्मकुमारी विद्यालयात आध्यात्मिक संतमेळा
By Admin | Updated: August 23, 2015 23:53 IST2015-08-23T23:52:56+5:302015-08-23T23:53:26+5:30
ब्रह्मकुमारी विद्यालयात आध्यात्मिक संतमेळा

ब्रह्मकुमारी विद्यालयात आध्यात्मिक संतमेळा
नाशिक : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आध्यात्मिक संतमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माउंटअबू येथील ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचे धार्मिक समन्वय प्रमुख बी. के. रामनाथ, क्रांतिकारी स्वामी इंद्रदेव महाराज, महामंडलेश्वर हिमालय बाबा, ब्रजभूषण महाराज इंद्रमुनी, संतोष दीदी, गोदावरी दीदी, दिव्या दीदी आदि उपस्थित होत्या.
पंचवटीतील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित आध्यात्मिक मेळ्यात रविवारी संतमेळ्यात विविध संत-महंतांनी आध्यात्मिक विचार मांडले. यावेळी बी. के. रामनाथ म्हणाले की, मनुष्याला अध्यात्माची आवश्यकता आहे. शरीर नव्हे तर आत्म्याचा विचार महत्त्वाचा आहे. यासाठी विश्वविद्यालयाचा विचार समजून घेणे आवश्यक आहे. इंद्रदेव महाराज यांनी मन आणि बुद्धी तसेच आत्मा यांच्यातील फरक स्पष्ट केला. प्रास्ताविक ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले. कार्यक्रमास महापौर अशोक मुर्तडक, पोलीस निरीक्षक आवारे आदि उपस्थित होते.