त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे. आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले. त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पाकिस्तान आणि चीनच्या आगळीकतेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, काही प्रश्न चर्चेतून सुटतात, त्याच्यासाठी यज्ञ ही ताकद आहे. संघटनाबरोबरच मानसिक शक्ती गरजेची आहे. त्यासाठी आपल्या सभोवतालचे वातावरणही सौहार्दपूर्ण हवे. त्रंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे, आज शिव सोबतच शक्तीचेहि मंदिर येथे प्रथापित झाल्यामुळे त्रंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले. यज्ञातून माणसाची मानसिक ताकद वाढते व ही ताकद एकत्रित होऊन शक्ती निर्माण होते. अशा एकत्रित शक्तीने देश बलवान होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
आध्यात्मिक शक्तीने प्रश्न सुटण्यास मदत : सुमित्रा महाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:58 IST