देवगाव परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:50+5:302021-08-17T04:20:50+5:30
▪️देवगांव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय देवगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच राजू कौले यांच्या ...

देवगाव परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
▪️देवगांव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय
देवगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच राजू कौले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रोशन वारे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी किसन राठोड, कर्मचारी पोपट रोकडे, विलास दोंदे, पोलीस पाटील अशोक जाधव, देवगांव सजेच्या तलाठी अर्चना नाडेकर व ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.
▪️पोलीस दूरक्षेत्र देवगाव...
देवगाव येथील घोटी पोलीस ठाण्यांतर्गत देवगाव पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस नाईक (२१४६) रविराज जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस शिपाई गोविंद सदगीर, पोलीस पाटील अशोक जाधव, सरपंच राजू कौले व ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.
----------------
▪️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवगाव
जिल्हा परिषद शाळेत शालेय समितीच्या अध्यक्षा सुनीता दोंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सतीश कचवे, सहशिक्षक भास्कर मुके, गोटीराम दोंदे, मुकुंदा दोंदे, अंगणवाडी सेविका जयवंता वारे, आशासेविका पर्वता वारे, सुरेखा दोंदे, सुनीता वारे व ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.
------------------
▪️शासकीय कन्या आश्रमशाळा, देवगाव.
आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची शासकीय कन्या आश्रमशाळेत सरपंच राजू कौले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अरविंद सुरवाडे, बी. बी. गावंडे, एस. एम. कोल्हे, के. आर. बेंडकोळी, बी. सी. चव्हाण, आर. टी. देवरे, व्ही. पी. देवरे, व्ही. आर. पवार, आदी उपस्थित होते.
-----------------
▪️टाकेदेवगाव ग्रामपंचायत
टाकेदेवगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण सरपंच पर्वता झोले यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य अलका झोले, उपसरपंच चित्रा धनगर, ग्रामसेवक बी. ए. मांगटे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग झोले, अविनाश झोले, केंद्रप्रमुख पंढरीनाथ ढगे, जि. प. शाळा मुख्याध्यापक उत्तम भवारी उपस्थित होते.
--------------------
▪️झारवड खुर्द येथे वह्यांचे वाटप
देवगाव परिसरातील झारवड खुर्द। येथे भारतीय स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवानिमित्त आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्याकडून झारवड येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना २०० वह्या व पेनांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अहीराव, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष लक्ष्मण जाधव, ग्रामसेवक श्रीमती कोळी, ग्रामपंचायत शिपाई सीताराम पारधी सर्व शिक्षकवृंद व हर हर महादेव ग्रुप झारवड खुर्द, आदी उपस्थित होते.
---------------(१६ देवगाव)
160821\16nsk_29_16082021_13.jpg
१६ देवगाव