शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

" स्पाईक " श्वानाला मिळाले हक्काचे कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 9:25 PM

नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन‌् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील संगोपनाची जबाबदारीही त्यांनीच स्वीकारली. स्पाईकचे घरी आगमन होताच हिरे कुटुंबीयांनी मोठ्या आनंदाने जल्लोषात केक कापून त्याचे स्वागत केले.

ठळक मुद्देजल्लोषात स्वागत : बॉम्ब शोधक-नाशक पथकातील हॅन्डलर करणार पुढील सांभाळ

नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन‌् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील संगोपनाची जबाबदारीही त्यांनीच स्वीकारली. स्पाईकचे घरी आगमन होताच हिरे कुटुंबीयांनी मोठ्या आनंदाने जल्लोषात केक कापून त्याचे स्वागत केले.लॅब्रोडोर जातीचा शांत स्वभावाचा मात्र स्फोटकसदृश वस्तूंचा शोध घेण्यात तितकाच तरबेज असलेला स्पाईक तीन महिन्यांचा असताना बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झाला. या श्वानाची तेव्हापासून हिरे यांनीच काळजी घेत संगोपन केले. त्याचा वेळोवेळी सराव करून घेणे, औषधोपचार, खाद्यपुरवठा आदी बाबींची बारकाईने खबरदारी घेत स्पाईकची निगा राखली. शहरात पार पडलेला सिंहस्थ कुंभमेळा असो किंवा अलीकडेच राष्ट्रपती, पंतप्रधान यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांप्रसंगीसुध्दा आपली भूमिका स्पाईक श्वानाने चोखपणे बजावली. हे श्वान अत्यंत कष्टाळू आणि आज्ञाधारी असल्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले. याच्या सेवानिवृत्तीमुळे आता बीडीडीएस पथकाकडे केवळ ह्यलकीह्ण हे एकमेव श्वान राहिले असून लवकरच दुसऱ्या श्वानाचे आगमन पथकात होणार असल्याचे ते म्हणाले....अन‌् कुटुंब झाले हर्षोल्हासितहिरे यांच्याकडून नेहमीच स्पाईकच्या कामगिरीचे कौतुक त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या कानी पडत असे. स्पाईकचे कर्तब सातत्याने ऐकल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही कुतूहल वाटत होते. ११ वर्षांची सेवा बजावल्यानंतर कुटुंबात आलेल्या या नव्या सदस्याचे सर्वांनीच जोरदार स्वागत केले. घरात फुगे लावून सजावट करण्यात आली होती. तसेच सुवासिनींकडून त्याचे औंक्षणही करण्यात आले आणि घरातील युवा मंडळींनी केकचा बंदोबस्त केला होता. ह्यवेलकम स्पाईकह्ण म्हणत घरातील सदस्यांनी एकच जल्लोष केला.दहा वर्षांपासून पोलीस नाईक गणेश हिरे यांनीच स्पाईकची देखरेख केली. दोघांना एकमेकांचा लळा लागला. हिरे हे श्वानप्रेमी असून ते श्वानांना प्रशिक्षणाचे धडेही देतात. यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये स्पाईकची पुढील संगोपनाची जबाबदारीही हिरे यांच्यावरच सोपविण्यात आली.- विजय शिंदे, पोलीस निरिक्षक, बीडीडीएस- (फोटो आर वर २४विजय नावाने)- 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेdogकुत्रा