शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

स्मार्ट सिटीचा प्रलंबीत निधी नाशिककरांच्या  आरोग्य व्यवस्थेवर खर्च करा

By संजय पाठक | Updated: April 29, 2021 16:12 IST

नाशिक- कोरोनामुळे शासनालाही घोर लावलाय, नागरीकांचेच नव्हे तर शासकीय उत्पन्नावर देखील परीणाम झालाअआहे. अशावेळी नागरीकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जर निधी कमी पडत असेल तर स्मार्ट सिटी सारख्य कंपनीला महापालिकेनेचे दिलेला हक्काचा निधी तूर्तास मागवून घेणे ते गैर काय? गेल्या वर्षभरापासून यावर चर्चा सुरू आहे. मात्र, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी निधीकडून निधी वर्ग करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याचे कारण काय? हे मात्र कळू शकत नाही.

ठळक मुद्देसाडे तीनशे कोटी पडूननिर्णयाला विलंब कशासाठीसंकटकाळात प्रकल्प राबवून काय होणार ?

नाशिक- कोरोनामुळे शासनालाही घोर लावलाय, नागरीकांचेच नव्हे तर शासकीय उत्पन्नावर देखील परीणाम झालाअआहे. अशावेळी नागरीकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जर निधी कमी पडत असेल तर स्मार्ट सिटी सारख्य कंपनीला महापालिकेनेचे दिलेला हक्काचा निधी तूर्तास मागवून घेणे ते गैर काय? गेल्या वर्षभरापासून यावर चर्चा सुरू आहे. मात्र, नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी निधीकडून निधी वर्ग करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याचे कारण काय? हे मात्र कळू शकत नाही.

शहरात गेल्या वर्षी कोरोनाचे संकट उदभवले तेव्हा शासनाने महापालिकेला मदत केली. महापालिकेने देखील अन्य नागरी कामांचा निधी काेरोना उपचार आणि व्यवस्थापनासाठी वर्ग केला. नोव्हेंबर महिन्यात कोरोना संपला म्हणता म्हणता पुन्हा फेब्रुवारीपासून हे संकट नव्याने आले. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला कोरोनाने ग्रासले. त्यामुळे उत्पन्नात चारशे कोटी रूपयांची घट आली. नवीन प्रकल्प सोडाच परंतु आता पुन्हा कोरोनावर पुन्हा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. अशावेळी आर्थिक चणचण जाणवणे स्वाभाविक आहे. नगरसेवकांनी महासंकटात समजदारीची भूमिका घेतली आणि नगरसेवक निधी याकामासाठी वर्ग केला आहे. परंतु तरीही निधी कमी पडत असल्याने अखेरीस विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे पडून असलेला निधी कोरोना व्यवस्थापनासाठी वापरावा अशी भूमिका घेतली आहे. अर्थात, गेल्या वर्षी महापौर सतीश कुलकर्णी यांनी देखील हीच भूमिका घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात निधी वर्ग करून घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे आणि नंतर विद्यमान आयुक्त कैलास जाधव यांनी ठोस कृती का केली ते कळू शकले नाही.

केंद्र शासनाची स्मार्ट सिटी योजना ही कागदोपत्री चांगली असेल अपवाद वगळता कुठेही या याेजनेचे निर्भेळ यश दिसत नाही. राज्यातील दहा शहरात ही स्मार्ट सिटी साठी कंपनीकरण करण्यात आले असल्याने सर्वच ठिकाणी नगरसेवक आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात संघर्ष उभा ठाकला आहे. नाशिकमधील कंपनीची ‌स्थिती यापेक्षा वेगळी नाही. स्मार्ट सिटी हे केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपत्या मानले गेले तरी नाशिकमध्ये मात्र ते कंपनीचे अध्यक्ष आणि सध्या राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे अपत्य मानले गेल आहे. सहाजिकच या कंपनीच्या बऱ्या वाईट चर्चा झाल्या किंवा संचालकांंनी एकमताने कंपनीच्या कोणत्याही प्रकारचा निर्णय फिरवायाचे ठरवले तरी त्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळेच की काय परंतु महापौर आणि विरोधी पक्ष नेते दोन्हींचे कंपनीकडून निधी घेण्याबाबत एकमत आहे. मात्र,आयुक्त याबाबत निर्णय घेण्याचे धाडस दाखवतील का हा खरा प्रश्न आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या