शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अहमदनगर जिल्ह्यातून हरविलेल्या गतिमंद महिलेला केले मुलाच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:35 IST

अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले. गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिला चहापान देऊन चौकशी केली. ती गतिमंद असल्याचे प्रारंभीच त्यांच्या लक्षात आले.

ओझर टाउनशिप : अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले.गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिला चहापान देऊन चौकशी केली. ती गतिमंद असल्याचे प्रारंभीच त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओझर पोलिसांशी संपर्क साधून तिला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सदर महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिचे नाव शारदा शिवाजी सांबरे असून, ती वंजारवाडी, ता. अहमदनगर, जि. अहमदनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. नगर पोलीस ठाण्याशी संपर्ककरून हरविलेल्या शारदा सांबरे यांचा मुलगा संतोष शिवाजी सांबरे याचा शोध घेऊन पोलिसांनी फोन नंबरही मिळविला व त्यास खात्री करून दिली. संतोष सांबरे यास ओझर येथे बोलावून घेतले व योग्य ती समज देत हरविलेल्या शारदा सांबरे यांना त्याच्या हवाली करून मातृसेवेचा सल्ला दिला.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं