इगतपुरीत जलयुक्त शिवाराच्या कामांना गती

By Admin | Updated: April 30, 2017 23:09 IST2017-04-30T23:09:06+5:302017-04-30T23:09:24+5:30

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामांना गती मिळाली

The speed of the work of Igatpuri Water Sewer | इगतपुरीत जलयुक्त शिवाराच्या कामांना गती

इगतपुरीत जलयुक्त शिवाराच्या कामांना गती

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामांना गती मिळाली असून अडसरे खुर्द तसेच धामणी ग्रामपंचायत अंतर्गत गांगडवाडी, चव्हाटेवाडी येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत शिवारफेरी काढण्यात आलीे.
यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी गावातील जुन्या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी पाहणी केली. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील डसरे,गांगडवाडी,चव्हाटेवाडी, या गावांना कायमच दुष्काळी परिस्थिती असते. दरवर्षी ट्रॅकरद्वारे वाडीला पाणी पुरविले जाते. जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने या गावांची निवड झाली असून, पहिल्या टप्प्यात सिमेंट बंधारे, शेततळे, वनतळे, जमीन सपाटीकरण, आदी महत्त्वपूर्ण उपक्र म हाती घेण्यात आले असून, दुष्काळावर मात करणे अगदी सोपे झाले आहे.यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे, वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी जे. आर. जाधव, महेश वाघ, स्थानिक स्तरचे जैन, सरपंच मंदा गोडे, उपसरपंच संगीता भोसले, कृषी सहायक रणजित आंधळे,
रुपाली बिडवे, संजय भांड, कृषी सहायक आल्हाद, ज्ञानेश्वर मुंडे, बबन बांबळे आदी ग्रामस्थ शिवारफेरीत सहभागी झाले होते.
पाणी अडवा पाणी जिरवा हे ब्रीद अंगीकारा, पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब अनमोल आहे. प्रत्येक बंधारे वेळोवेळी भरले गेले असते तर आज ही अवस्था झाली नसती. आज तालुका दुष्काळात होरपळत आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचे पाणी अडवा, शेतीत ठिबक सिंचनाचा वापर करा, पाणी हेच जीवन आहे ते ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: The speed of the work of Igatpuri Water Sewer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.