पेठ तालुक्यात भात लावणीला वेग
By Admin | Updated: July 22, 2016 22:30 IST2016-07-22T22:19:32+5:302016-07-22T22:30:45+5:30
उत्साह : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

पेठ तालुक्यात भात लावणीला वेग
पेठ : मागील दोन वर्षापासून वरुणराजाने काहीशी दडी दिल्याने नाराज झालेला बळीराजा
यावर्षीच्या समाधानकारक पावसाने सुखावला असून, सद्यस्थितीत पेठ तालुक्यात सर्वत्र भात व नागलीची लावणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्याचे पावसाचे माहेरघर म्हणून पेठ तालुक्याला ओळखले जाते. याठिकाणी खरीप हंगामात भात, नागली, खुरासणी अशी प्रमुख पिके घेतली जातात. भात व नागलीच्या पेरणीचे दोन भागात विभागणी केली जात असून, पावसाळ्यापूर्वी राब भाजणीच्या जागेवर पेरणी केलेले बियाणेची वाढ होऊन तयार झालेली रोपे रिमझिम पावसात गुढघाभर चिखलात डोक्यावर पाणघोंगडे (इरले) अथवा घोंगडी घेऊन शिवारभर आदिवासी बळीराजा भाताची लागवड करताना दिसून येत आहे.
गत आठवड्यापासून पेठ तालुक्यात समाधानकारक पावसाने सुरुवात केली असून, भाताची खाचरे भरली आहेत. त्यामुळे दोन दिवसानंतरच्या मुसळधारेनंतर रिमझिम पावसाने भात लवणीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)