शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:07 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.  एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या भागात सर्वत्र सोयाबीनचे पीक बºयापैकी आले आहे. काही ठिकाणी उशिरा पेरलेले सोयाबीन अजूनही पिवळसर असल्याने साधारणत: आठवडाभराने कापणीस येईल. तर काही ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू  आहे.  हल्ली शेतकºयांकडून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढले जाते. ज्यांनी सोयाबीन काढले त्यांनी आॅक्टोबरच्या कडक उन्हात वाळवून गोण्या भरून ठेवल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकरी सिन्नरफाटा, नाशिक पेठरोड मार्केट, पिंपळगाव अथवा सायखेडा मार्केटला आपापल्या सोईने सोयाबीन विक्रीसाठी नेत असून, सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. काही व्यापारी थेट शेतातूनच २५०० ते २८०० रुपये क्ंिवटलने खरेदी करीत आहेत.शेतकºयांना भाजीपाल्याचा आधारपरिसरातील शेतकºयांना सध्या भाजीपाला पिकांचा आधार आहे. त्यातल्या त्यात पालकाची भाजी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी पालकाची भाजी सिन्नर फाटा मार्केट, जेलरोड शनिमंदिर, नोट प्रेस समोरचे भाजी मार्केट येथे जुडीने व्यापारी भाजी खरेदी करीत आहेत.४साधारणत: ७०० ते ८०० रुपये शेकडा जुडी पालकाचा दर आहे. काही व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतातूनच पालक ठोक पद्धतीने खरेदी करतात. त्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा कालावधी पालकासाठी जास्त मागणीचा असतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.रब्बीच्या पूर्व मशागतीला वेगसोयाबीन काढून झाल्यानंतर शेत नांगरुन ते रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, ज्वारी पिकांची तयारी शेतकरी करीत आहेत. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिली असली तरी या भागातील शेतकºयांना दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचा थोडाफार आधार आहे. त्यातून खरिपाची पिके जगली असली तरी रब्बीच्या पिकांना मात्र ताण पडू शकतो. पावसाची कमतरता असल्याने विहिरींना यंदा कमी पाणी उतरले. धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने दोन्ही नद्यांना पाणी कमी प्रमाणात राहील. त्यामुळे रब्बीच्या पिकांना ताण पडेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNashikनाशिक