निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी हालचालीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 19:39 IST2021-02-21T19:36:58+5:302021-02-21T19:39:50+5:30
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणुक गुरुवारी (दि.२५) होणार असल्याने गावातील वातावरण तापले आहे.

निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी हालचालीला वेग
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणुक गुरुवारी (दि.२५) होणार असल्याने गावातील वातावरण तापले आहे.
निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन राजकीय वातावरण शांत झाले होते, पण सरपंच निवडीची तारीख जाहीर झाली अन् निऱ्हाळेकरांचे राजकीय वातावरण तापले आहे. आता निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीवर सरपंच हा निऱ्हाळेकरांचा कि फत्तेपूरकरांचा ह्यासाठी गावातील गावगाडा चालवणारे आजी माजी सरपंच व सदस्य तसेच नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.
सरपंचपद हे सर्व साधारण स्त्री राखीव असलेल्याने निऱ्हाळ्यातील मनिषा यादव कि फत्तेपूरकरांची वंदना सांगळे नाहीतर बिनविरोध निवडून आलेल्या योगिता जाधव होताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.