शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘रक्षाबंधन’साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 19:03 IST

नाशिक : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ ते २७ आॅगस्टदरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देदि. २५ ते २७ आॅगस्ट दरम्यान जादा बसेस यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस

नाशिक : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ ते २७ आॅगस्टदरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचा-यांची नियुक्ती करून प्रवाशांना बससेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले आहेत. त्याबरोबरच प्रवासी बांधवांनी ‘एसटीरु पी बहिणीला केवळ एसटीतूनच प्रवास करीन’ असे ओवाळणीरु पी अभिवचन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहीण भावाकडे ओवाळण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवास वाहतूक करून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवले आहे.

त्यासाठी प्रमुख बसस्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवासीमित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणा-या मार्गस्थ निवा-यावर जादा बसेसची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करून प्रवाशांना सुरक्षित व वक्तशीर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील, असे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ