Special trains to transport essential goods | जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या 

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा यासाठी मध्य रेल्वे दोन विशेष पार्सल गाड्या चालविणार असून, ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या असतील त्यांनी रेल्वेस्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्या पुढीलप्रमाणे-डाउन कल्याण-संकरैल गाडी ९ एप्रिलला कल्याण स्टेशनहून २०.३०ला निघेल. १२ एप्रिलला संकरैल येथे १२ वाजता पोहोचेल. अप संकरैल गाडी १३ एप्रिलला निघून १५ एप्रिलला कल्याणला १८.०० वाजता पोहोचेल. ९ एप्रिलला कल्याणहून जाताना ती इगतपुरी येथे २३ वाजता, तर नाशिकला २३.५५ वाजता पोहोचेल. १० एप्रिलला मनमाडला २ वाजता, जळगावला ५.१५ वाजता, भुसावळला ०६.४५ वाजता, बडनेराला ११ वाजता, नागपूरला ४.०० वाजता पोहोचेल. १३ एप्रिलला येताना ती भुसावळला ४.३० वाजता, जळगावला ६ वाजता, मनमाडला १० वाजता, नाशिकला १२ वाजता, इगतपुरीला १४.३० वाजता पोहोचेल व १५ एप्रिलला कल्याणला पोहोचेल.
डाउन कल्याण-चांगसारी स्टेशन ही गाडी ७ एप्रिलला कल्याणहून निघेल. इगतपुरीला ती २३ वाजता, तर नाशिकला २३.५५ वाजता पोहोचेल. १० एप्रिलला मनमाडला २ वाजता, जळगावला ५.१५ वाजता, भुसावळला ०६.४५ वाजता पोहोचेल. चांगसारीहून १० एप्रिलला निघाल्यावर भुसावळला ४.३० वाजता, जळगावला ६ वाजता, मनमाडला १० वाजता, नाशिकला १२ वाजता, तर इगतपुरीला १४.३० वाजता व १३ एप्रिलला कल्याणला पोहोचेल. ज्यांना जीवनावश्यक वस्तू बाहेर पाठवायचे आहेत त्या व्यापारी, शेतकरी आदींनी संबंधित रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Special trains to transport essential goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.