लख्वीच्या जामिनामुळे पाकचा ढोंगीपणा उघड विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा आरोप
By Admin | Updated: December 31, 2014 01:49 IST2014-12-31T01:49:00+5:302014-12-31T01:49:29+5:30
लख्वीच्या जामिनामुळे पाकचा ढोंगीपणा उघड विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा आरोप

लख्वीच्या जामिनामुळे पाकचा ढोंगीपणा उघड विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा आरोप
नाशिक : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमार्इंड झकी-उर रहमान लख्वीला जामिनावर मुक्त करणे व त्यानंतर पुन्हा त्याला दुसऱ्या एका गुन्'ात ताब्यात घेणे या पाकिस्तान सरकार व तेथील उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून, लख्वी प्रकरणात पाकिस्तानचा दहशवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा ढोंगीपणा उघड झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना निकम म्हणाले की, लख्वी प्रकरणी भारताने नापसंती व्यक्त केल्यामुळे आपण तुरुंगातून बाहेर पडू नये यासाठी बेकायदेशीरपणे स्थानबद्धतेचा आदेश काढण्यात आल्याचा आरोप लख्वीने पाक उच्च न्यायालयात केला आहे़ यामध्ये लख्वीची चूक नाही कारण, या दाव्याला विरोध करण्यासाठी पाकिस्तान सरकारतर्फे कोणीही न्यायालयात हजर नव्हते़ लख्वीच्या आरोपात तथ्य आढळल्यानेच न्यायालयाने स्थानबद्धतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली़