नांदगाव सरपंच निवडीसाठी विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:48 IST2021-02-09T21:06:28+5:302021-02-10T00:48:38+5:30
नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी जाहीर केल्या आहेत.

नांदगाव सरपंच निवडीसाठी विशेष सभा
नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी जाहीर केल्या आहेत.
शुक्रवार (दि.१२) व सोमवारी (दि.१५) फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नव्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पिठासनाधिकारी व त्यांच्या ग्रामपंचायती कंसात दर्शविल्याप्रमाणे-
के. एस. चौधरी (अनकवाडे, वंजारवाडी), सुनील धात्रक, साकोरा (जळगाव बुद्रुक ), सागर बच्छाव (बेजगाव, हिसवळ), डी. एस. मांडवडे (आमोदे, मांडवड), बी. के. राजगे (खिर्डी, भौरी), एस. डी. गोसावी (चिंचविहिर, परधाडी)
व्ही. ए. वाघ (ढेकू, जवळकी), एस. डी. चौधरी (लोहशिंगवे, दहेगाव), विजयकुमार ढवळे (न्यायडोंगरी, मोहेगाव), पी. ए. शेजवळ (पानेवाडी, भालूर), बी. एस. बोरसे (वडाळी खुर्द, वडाळी बुद्रुक), अशोक पाईक (कुसूमतेल, जळगाव खुर्द), मनोज मोरे (कोंढार, नांदूर), निखिल बोरुडे (बिरोळे, न्यू पांझण), जितेंद्र केदारे (वेहेळगाव, रणखेडा), नाना जाधव (हिंगणेदेहरे, बाभूळवाडी ), संतोष ढोले (धोटाणे बुद्रुक, अस्तगांव),आर. जे. चोळके (जातेगाव, वाखारी), डी. एम. महाजन (कासारी, रोहिले बुद्रुक), व्ही. एन. दराने (गंगाधरी, पोखरी), व्ही. एन. भागवत (टाकळी बुद्रुक, बाणगाव खुर्द), एस. बी. औरदकर (एकवई, क-ही), एन. व्ही. साळवे (पांझणदेव, सटाणे), साधना खराटे (गोंडेगाव ,माळेगाव कर्यात), पी. जे. पाटील (मळगाव, पिंप्राळे), आर. आर. डगळे (चांदोरा, तांदुळवाडी), पी. आर. नवले (मोरझर, माणिकपुंज)
१२ फेंब्रूवारीला होणाऱ्या अन्य ग्रामपंचायतीसाठी पुढीलप्रमाणे- या विशेष निवडीसाठी पिठासनाधिकारी म्हणून मयूर चौधरी (पिंपरी हवेली), डी. ए. धारक (बोलठाण), ए. जी. लेंगळे (सोयगाव), बी. बी. आहिरे (कळमदरी), राजेंद्र पाटील (सावरगाव) यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.