नाशिक : इंदिरानगरमध्ये २०११ साली एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन तेथील बिल्डरवर गोळीबार करणारी कुख्यात गुंड रवी पुजारीच्या टोळीला मोक्काअंतर्गत नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने शुक्रवारी (दि.१२) दोषी धरत जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली. टोळीतील तिघा आरोपींना जिवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात सश्रम कारावासाची जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार दंड तसेच महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) सश्रम कारावास व प्रत्येकी पाच लाख दंडाची शिक्षा विशेष मोक्का न्यायालयात न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी सुनावली.पाथर्डीफाटा येथील एका बांधकाम प्रकल्पावरील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात २५ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित विकासकुमार आणि संतोषकुमार सिंग हे दोघे आरोपी शिरले. त्यावेळी तेथे कामावर असलेल्या प्रियंका पलाडकर यांनी आरोपींकडे विचारपूस केली. आरोपींनी बनाव करत पाकीट द्यायचे आहे, असे खोटे कारण सांगितले. यावेळी बांधकाम व्यावसायिक अशोक मोहनानी हेदेखील तेथे आल्याचे बघून दोघांनी स्वत:जवळील पिस्तूलने गोळीबार केला होता. यावेळी प्रियंका आणि मोहनानी हे दोघे प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने बचावले; मात्र देविका कोडिलकर व रणजीत हे कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्याच जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी संजय सिंग, अरविंद चव्हाण व विकासकुमार सिंग यांना अटक केली. त्यांनी चौकशीत गँगस्टर रवी पुजारी याच्या सांगण्यानुसार मोहनानी यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केल्याची कबुली दिली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ४२ ते ४९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता सुधीर कोतवाल, अजय मिसर यांनी कामकाज पाहिले.फरार संशयितांविरुद्ध स्वतंत्र खटलापुजारी हा २००५सालापासून मोहनानी यांच्याकडे खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देत होता. संघटित गुन्हेगारी केल्याने पोलिसांनी या गुन्हेगारांवर १८ मे २०११ रोजी मोक्कानुसार कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशियत रवी पुजारी, योगेश बंगेरा उर्फ कल्ली योगेश, सुरेश शेट्टी, भुपेंद्र सिंगविरोधात दोषारोप निश्चित करून नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्या अद्याप चार संशयित आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वतंत्ररीत्या खटला चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
विशेष मोक्का न्यायालय :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:39 IST
पुजारी हा २००५सालापासून मोहनानी यांच्याकडे खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देत होता. संघटित गुन्हेगारी केल्याने पोलिसांनी या गुन्हेगारांवर १८ मे २०११ रोजी मोक्कानुसार कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशियत रवी पुजारी, योगेश बंगेरा उर्फ कल्ली योगेश, सुरेश शेट्टी, भुपेंद्र सिंगविरोधात दोषारोप निश्चित करून नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्या अद्याप चार संशयित आरोपी फरार आहेत.
विशेष मोक्का न्यायालय :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीला जन्मठेप
ठळक मुद्देफरार संशयितांविरुद्ध स्वतंत्र खटला इंदिरानगर पोलीस ठाण्याच जिवे ठार मारण्याचा गुन्हा