विशेष महानिरीक्षकांचे वाहन फोडले
By Admin | Updated: October 10, 2016 00:46 IST2016-10-10T00:45:11+5:302016-10-10T00:46:49+5:30
विशेष महानिरीक्षकांचे वाहन फोडले

विशेष महानिरीक्षकांचे वाहन फोडले
पालकमंत्री गिरीश महाजन यांचे वाहन कसेबसे त्र्यंबकेश्वरकडे पोलिसांनी काढून दिल्यावर त्यांच्या पाठीमागे असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्या वाहनावर जमावाने आपला राग काढला. त्यांच्या वाहनांच्या काचेवर मोठा दगड टाकून ते फोडण्यात आले तसेच वाहनाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेली पाटी तोडून टाकण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चौबे यांनी तत्काळ वाहनातून खाली उतरत पायीच रस्ता धरला. असाच प्रकार आमदार सीमा हिरे यांच्या वाहनाबाबत घडला. हिरे यांनी पालकमंत्र्यांसमवेत त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्यांचे वाहन पुढे जाऊ देण्यास मज्जाव केला तसेच वाहनावर चपला फेकून आपला राग व्यक्त केला. अखेर त्यांनाही पायी चालत मार्गक्रमण करावे लागले.