गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST2021-07-31T04:15:43+5:302021-07-31T04:15:43+5:30

शुक्रवारी सकाळी डॉ. आवेश पलोड व विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थित पंचवटी विभागातील रामकुंड परिसरात स्वछतेची ...

Special cleaning campaign on Godaghata | गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम

गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम

शुक्रवारी सकाळी डॉ. आवेश पलोड व विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थित पंचवटी विभागातील रामकुंड परिसरात स्वछतेची पाहणी करण्यात येऊन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, तसेच गोदावरी नदीच्या पुरात वाहून आलेल्या पानवेली तत्सम कचरा कर्मचाऱ्यांमार्फत काढण्याचे

काम हाती घेण्यात आले.

गौरी पटांगण येथे विशेष स्वछता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. रामकुंड परिसरात निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले असून, नागरिकांनी तसेच भाविकांनी फक्त निर्माल्य टाकावेत, हॉटेल व व्यावसायिकांनी निर्माल्य कलशात खाद्य वस्तू टाकू नयेत, याबाबत परिसरात जनजागृती करण्यात आली.

यावेळी परिसरातील पुरोहितांना भेटून धार्मिक विधिसाठी येणाऱ्या नागरिकांना कोविड नियमांचे पालन करणे व अनावश्यक गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: Special cleaning campaign on Godaghata