शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:22 IST

अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नाशिकरोड : अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे.सर्व वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे तसेच वितरण उपकेंद्रे व वाहिन्यांवरील भार त्यांच्या क्षमतेपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जातात. कृषिपंपांना दिवसा ८ तर रात्री १० तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. याशिवाय रोहित्र, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांवरील भार त्यांच्या क्षमतेच्या मर्यादेत ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत कक्ष व उपविभागीय कार्यालयांना आदेशित करण्यात आले आहे. तथापि रोहित्र जळणे, वीजवाहक तारा तुटणे, खंडित वीजपुरवठा, कमी दाबामुळे कृषिपंप जळणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून संबंधित वाहिन्यांवर कृषि पंपाचा अवैध वीजवापर अधिक असल्याचे आढळून आले आहे.  या पार्श्वभूमीवर पुढील चार ते सहा आठवड्याच्या काळात कक्ष, उपविभागीय व विभागीय कार्यालयांना कृषिपंप वाहिन्यांवरील अवैध वीज वापराला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी परिमंडळातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे.१३९० कोटींची थकबाकीनाशिक जिल्ह्यात एकूण ३ लाख १८ हजार ४३५ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार १३५ ग्राहकांकडे वीज बिलाची १३९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण ग्राहकांपैकी जवळपास ४ टक्के कृषिपंप ग्राहक वीज बिलाचा नियमित भरणा करत असल्याचे चित्र आहे....तरच रोहित्र दुरुस्त करून मिळेलकृषिपंप ग्राहकांकडील मोठ्या थकबाकीमुळे महावितरणला दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या असून कर्जाची परतफेड करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक राहील. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय दुसरे रोहित्र बसविण्यात येणार नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :electricityवीजbillबिल