शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:44 IST

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.

ठळक मुद्दे५६० जणांवर कारवाई; ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.जिल्ह्यात अवैधरीत्या मद्याची विक्री व वाहतूक करणारे, हातभट्टीची गावठी दारू तयार करणारे, अंक आकडे तसेच पत्त्यांवर पैसे लावून अवैधरीत्या मटका व जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या इसमांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉटेल-ढाबे, गावपातळीवरील अवैधरीत्या चालणारे दारूचे अवैध धंदे चालणारे ठिकाणांची माहिती घेऊन छापे टाकण्यात येत आहे. जिल्ह्यातील महामार्गावर होणारी अवैध वाहतूक तसेच बेशिस्त वाहनचालकांवरही जिल्हा वाहतूक शाखा तसेच वाहतूक पोलिसांच्या मार्फतीने कारवाई चालू आहे.जिल्ह्यातील या विशेष मोहिमेत अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारे तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाºया एकूण ५६० इसमांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाईत सुमारे ३१ लाख ३८ हजार ७०३ रुपयांचा अवैध मद्यसाठा, हातभट्टीची गावठी दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आली आहे. मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये एकूण १०८ केसेस करण्यात आल्या असून सुमारे १५० जुगारी इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ३७ हजार ९०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.बेशिस्त वाहनचालकांकडून १५ लाखांचा दंडच्जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, शहर वाहतूक शाखा मालेगाव तसेच पोलीस ठाणेनिहाय वाहतूक पोलिसांनी सदर मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन विनाहेल्मेट व सीटबेल्ट, मोबाइलवर बोलणारे चालक, नो पार्किंग झोन, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, अवैध वाहतूक तसेच भरधाव वाहन चालविणाºया इसमांवर ७५५७ केसेस दाखल केल्या व त्यांच्याकडून १५ लाख २० हजार ८०० रु. चा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २८४२ केसेस करण्यात येऊन ६९ वाहने जप्त करण्यात आली असून, २५ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच ३० वाहनांचे निलंबन प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी