शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फांद्या, पाला पाचोळा उचलण्यासाठी विशेष घंटागाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:37 IST

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे,

ठळक मुद्देमहापालिकेची उद्घोषणा : आठवड्यातून एक दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे,त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून विद्रुपीकरण होत असल्याने महापालिकेने या पुढे आठवड्यातून एक दिवस प्रत्येक प्रभागातूनविशेष घंटागाडी फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. झाडाच्या फांद्या, गवत, पाला पाचोळा या घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने प्रत्येक नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली आहे, प्रत्येक प्रभागात, गल्ली बोळात जाऊन ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला तसेच दुर्गंधी, डासांचे प्रमाण कमी झाले, त्याचबरोबर शहर सुंदर झाले आहे. कचऱ्याच्या विलीगिकरणातून प्रक्रिया करून खत प्रकल्प देखिल कार्यरत आहे. घरातील ओला, सुका कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जात असला तरीही झाडांपासून तयार होणाºया कचºयाचा प्रश्न कायम आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांकडून विजेच्या ताराना अडथळा ठरू पाहणारे झाडाच्या फांद्या तोडण्यात येतात, त्या रस्त्याच्या कडेला तशेच टाकून दिलेल्या असतात. या शिवाय बंगले, उद्यान, सोसायटी, कॉलोनी परिसरातील झाडे, झुडुप्यांची कटाई करून नागरिकांकडून रस्त्यावर अथवा सोसायटीच्या बाहेर टाकून दिले जाते. घंटागाडी कर्मचारी ते उचलण्यास नकार देतात परिणामी या कचºयामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्याचा विचार करून महापालिकेने आता विशेष घंटागाडी फक्त झाडा पासून तयार होणारा कचरा उचलण्यासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा प्रभागात फिरणाºया घंटागाडीच्या ध्वनी क्षेपकावरून केली जात आहे. या विशेष घंटागाडीतच नागरिकांनी झाडाच्या फांद्या, नारळाच्या फांद्या, गावात, झुडुपे टाकावे असे आवाहन केले जात आहे. मात्र आठवड्यातून कोणत्या दिवशी ही घंटागाडी येईल याचा उलगडा केला जात नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य