शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:09 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. येत्या दि. २९ तारखेस होणाºया महासभेत हा प्रस्ताव असल्याने आता घाईघाईने या प्रकल्पातील प्रस्तावित शेतकºयांची तातडीची बैठक स्मार्ट सिटी कंपनीने येत्या दि. २८ तारखेस बोलाविली आहे.महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. सदरच्या प्रकल्पास शेतकºयांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर नाशिकमधील प्रकल्पाचे सादरीकरण कालिदास कलामंदिरात करण्यात आले. त्यावेळी शेतकºयांनी या प्रकल्पात सहभागी शेतकºयांना नक्की काय लाभ मिळणार, असा प्रश्न केला होता. मात्र आधी सर्वेक्षण करू द्या, मगच लाभाचे गणित मांडता येईल असे शेतकºयांनी स्पष्ट केले होते. शेतकºयांनी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर प्रकल्पास तयार असल्याने इरादा असल्याचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त करून सर्वेक्षण बंद पाडले. हा विषय तहकूब करून स्वतंत्र महासभेत त्यावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा करू देण्यात आले.लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा थंड होता. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले तर आयुक्तांनीदेखील शेतकºयांना जमिनीच्या सहभागाच्या निकषावर तीन मॉडेल मांडले होते. परंतु ते अधिकृतरीत्या शेतकºयांपर्यंत अद्याप पाठविण्यात आलेले नाही तोच येत्या बुधवारी (दि. २९) होणाºया महासभेत ते मांडण्यात आल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने तातडीने शेतकºयांची बैठक कालिदास कलामंदिरात बोलावली आहे.तीन प्रकारचे फॉर्म्युलेशेतकºयांनी ग्रीन फिल्ड क्षेत्रासाठी जागा द्यावी यासाठी तीन प्रकारचे लाभाचे फॉर्म्युले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मांडले आहेत. त्यानुसार ५० टक्के जागा कंपनीला व ५० टक्केजागा शेतकºयांच्या मालकीची असेल तर काय लाभ मिळू शकतील, त्याच धर्तीवर शेतकºयांनी ५५ टक्के आणि तिसºया फॉर्म्युल्यानुसार ६० टक्के जागा स्वत:कडे ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात याबाबत लाभांचे गणित मांडले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरीSmart Cityस्मार्ट सिटी