देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

By Admin | Updated: May 29, 2016 00:17 IST2016-05-28T23:13:23+5:302016-05-29T00:17:49+5:30

पर्रिकर : नूतनीकृत सावरकर वाड्याचे लोकार्पण

Speaking against the country is a treason | देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

नाशिक : राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. या देशाचे तुकडे व्हावे, असे
कोणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. देशातील नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून देशप्रेम व राष्ट्रभक्तीसारख्या गुणांचे अनुकरण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या सावरकर वाड्याच्या नूतनीकृ त इमारतीचे पर्रिकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) उद्घाटन झाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, नगराध्यक्ष अनिता करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, बाबूराव मोजाड, शिवराम झोले, निवृत्ती जाधव आादि उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र जेएनयूतील देशविरोधी घोषणांच्या प्रकरणावर बोलताना क न्हैया कुमारचा नामोल्लेख टाळत पर्रिकर म्हणाले, या देशाचे तुकडे व्हावे, असे कुणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक हेमंत गोडसे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Speaking against the country is a treason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.