सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:22 IST2020-01-22T23:16:43+5:302020-01-23T00:22:03+5:30

नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीत सर्व समित्यांचे सदस्य व प्रत्येक समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना पालिकेतर्फे संजय मिसर यांनी मदत केली.

Speaker selection uncontested | सभापती निवड बिनविरोध

त्र्यंबक नगर परिषदेत बिनविरोध निवडून आलेले अनिता बागुल, शीतल उगले, संगीता भांगरे, त्रिवेणी तुंगार-सोनवणे, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष दीपक गिते व अन्य नगरसेवक.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर नगर परिषद : विषय समिती सदस्यांचाही समावेश

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीत सर्व समित्यांचे सदस्य व प्रत्येक समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना पालिकेतर्फे संजय मिसर यांनी मदत केली.
यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आदींसह सर्व सभासद उपस्थित होते. सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष यांच्यासह १८ पैकी १५ जागा मिळून एकहाती सत्ता मिळाली आहे. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, गटनेते समीर पाटणकर, स्वप्निल शेलार, कैलास चोथे उपस्थित होते.

पाणीपुरवठा : शीतल उगले, शिक्षण : दीपक गिते यांची वर्णी
आरोग्य रक्षण जत्रा समिती : सभापती अनिता शांताराम बागुल, सदस्य माधवी माधव भुजंग, सागर जगन्नाथ उजे, अशोक नथू घागरे व विष्णू मंगा दोबाडे. पाणीपुरवठा समिती सभापती शीतल कुणाल उगले, सदस्य- शिल्पा नितीन रामायणे, समीर रमेश पाटणकर, माधवी माधव भुजंग, स्वप्नील दिलीप शेलार.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती संगीता काळू भांगरे, सदस्य- सायली हर्षल शिखरे, भारती संपत बदादे, स्वप्नील दिलीप शेलार, कैलास कोंडाजी चोथे. महिला व बाल कल्याण समिती सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार-सोनवणे, सदस्य- भारती संपत बदादे, सायली हर्षल शिखरे, शिल्पा नितीन रामायणे, श्यामराव माधव गंगापुत्र.
शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक पांडुरंग गिते (लोणारी), सदस्य- सागर जगन्नाथ उजे, समीर रमेश पाटणकर, विष्णू मंगा दोबाडे, अशोक नथू घागरे.

Web Title: Speaker selection uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.