शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादी कार्यालयाच्या बाहेर फलकबाजीने चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:55 IST

परपक्षातील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वत:ला निष्ठावान राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी समर्थक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी व काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी आमदाराला दहा तोंडी रावण दाखवून ‘स्वार्थी गद्दार’ अशी व्यंगचित्राचे फलक लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक : परपक्षातील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वत:ला निष्ठावान राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी समर्थक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी व काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी आमदाराला दहा तोंडी रावण दाखवून ‘स्वार्थी गद्दार’ अशी व्यंगचित्राचे फलक लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने शहरात वेगवान राजकीय हालचाली व घडामोडी घडत असताना मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच दहा तोंडी रावणाचे व्यंगचित्राचे फलक लावण्यात आले आहे. या फलकावर रावणाच्या मुख्य चेहºयाच्या ठिकाणी राष्टÑवादीचे माजी आमदार जयंत जाधव यांचा, तर दोन्ही बाजूला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांचे चेहरे आहेत. या तिघांना ‘स्वार्थी गद्दार’ व ‘घरभेदी लंका ढाये’ असे संबोधण्यात आले आहे.बाहेरच फलक लावण्यात आल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू होऊन फलक लावणारा राष्टÑवादीचा निष्ठावंत कोण? त्याचा शोध सुरू आहे.नाशिक शहरातील चार जागांपैकी राष्टÑवादीच्या वाट्याला दोन व कॉँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या असून, त्यातील मध्य मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आलेला आहे व डॉ. हेमलता पाटील यांनी अर्जही दाखल केला आहे.अन्य मतदारसंघांमध्येदेखील दोन्ही पक्षांच्या सहमतीनेच उमेदवार देण्यात आलेले असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यावर अन्याय झाला व त्याच्या अन्याय करणारे फक्त तीनच नेते कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.या तिघांनी केलेल्या कृत्यावर फलकावर भाष्य करण्यात आले असून, त्यात ‘गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापी सहन करणार नाही’, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस