सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:47 PM2020-10-05T22:47:05+5:302020-10-06T01:12:17+5:30

नाशिक : आवक वाढल्याने जिल्ह्यात सोयाबीनचे भाव ३५० ते ४०० रुपयांनी उतरले असून लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला सध्या ३००० ...

Soybean prices fall by Rs 400 | सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांनी घसरण

सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांनी घसरण

googlenewsNext
ठळक मुद्देआवक वाढली : हमी भाव खरेदी केंद्रांवर नाव नोंदणी सुरू

नाशिक : आवक वाढल्याने जिल्ह्यात सोयाबीनचे भाव ३५० ते ४०० रुपयांनी उतरले असून लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला सध्या ३००० ते ३६५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. दरम्यान नाफेडतरफे सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रांवर अद्याप नाव नोंदणीची प्रक्रीया सुरु असून येथे १५ आॅक्टोंबरनंतर प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार आहे. येथील नाव नोंदणीला मात्र शेतक?्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसुन येत आहे.
नाफेडच्यावतीने जिल्ह्यातील मालेगव आणि येवला येथे हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सध्या या केंद्रांवर नाव नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्ष खरेदीला अद्याप सुरुवात झालेली नाही. मागील सप्ताहात लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला ४००० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र या सप्ताहात आवक वाढल्याने भाव ३५० ते ४०० रुपयांनी कोसळले असून सोमवारी सोयाबीन ३००० ते ३६५० रुपये प्रति क्विंटल दराने विकले गेले आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु असून आवक वाढल्यानंतर भाव अधिक कमी होण्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.
सोयाबीनला शासनाने ३८८० रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला असून जिल्ह्यात मालेगाव आणि येवला येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. १ आॅक्टोंबरपासून सुरु झालेल्या या केंद्रांवर सध्या नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. या नाव नोंदणीला मात्र शेतक?्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान मकाला शासनाने १८५० रुपये प्रति क्वींटल दर जाहीर केला असून नाफेडतफेर् १ नोव्हेंबरपासून मका खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे . खुल्या बाजारात मकाला सध्या १२०० ते १३०० रुपये भाव मिळत असल्याने मका खरेदी केंद्रांवर शेतक?्यांची गदर्प होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गतवषर्प जिल्ह्यात नाफेडतफेर् मका खरेदी केंद्र सुरु करुन १७६० रुपये हमी भाव देण्यात आला होता गतवषर्प जिल्ह्यात ३३९० शेतक?्यांकडून ९७२१९ क्विंटल मकाची खरेदी करण्यात आली होती. मका बरोबरच गतवषर्प ७११ क्विंटल चना, ३११.५० क्विंटल तुर आणि ५१० क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली होती. ज्वारीला २५५० रुपये प्रति क्विटल इतका दर देण्यात आला होता. यावषर्प ज्वारीच्या हमी भावात वाढ झाली असून २६२० रुपये इतका भाव जाहीर करण्यात आला आहे.

 

Web Title: Soybean prices fall by Rs 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.