द्राक्षासह सोयाबीन मका पिकांची नुकसान

By Admin | Updated: November 13, 2014 23:48 IST2014-11-13T23:47:44+5:302014-11-13T23:48:00+5:30

जिल्ह्यात जोरदार पाऊस

Soybean maize crops with grapefruit | द्राक्षासह सोयाबीन मका पिकांची नुकसान

द्राक्षासह सोयाबीन मका पिकांची नुकसान

 नाशिक : जिल्ह्यातील काही भागात आज सांयकाळी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे द्राक्षासह पिकांचे मोठे नुकसान झाले.
दिंडोरी : बेमोसमी पावसाने आज दिंडोरी शहरासह परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास हजेरी लावल्याने द्राक्ष पिकासह सोयाबीन व मका पिकांचेही मोठे नुकसान झाले
आहे निळवंडी , हातनोरे मडकेजांब कोराटे,पालखेड, मोहाडी, वणी,आदि परिसरात आज पावसाने हजेरी लावली त्यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आज झालेल्या पावसामुळे जे द्राक्ष पिक हे फुलोर्याच्या अवस्ततेत आहे त्याची कुज होऊ शकते तसेच डावणी ,भुरी , करपा आदि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकर्यांच्या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहे, तर सोंगनीला आलेल्या सोयाबीन मका पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे,त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
येवल्यात बेमोसमी पाऊस
येवला : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावात आज बेमोसमी पाऊसाने हजेरी लावली.गेल्या एक मिहन्यापासून पावसाने उघडीप दिलेली होती या पावसाने रब्बी पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
या पावसाने शेतकरी वर्गाचे कोणतेही नुकसान झाले नाही.उलट यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीपाचे पिक अगोदरच वाया गेलेले आहे.त्यामुळे हा पाऊस शेतकर्यांना हवासा वाटत आहे.येवला शहरात सायंकाळी 6 ते 6.30 दरम्यान पावसाने हजेरी लावली तत्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.तसेच हिवाळा सुरु होऊनही अपेक्षति थंडी पडलेली नाही.या पावसामुळे थंडी निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
करपा रोगाची शक्यता
वणी : परिसरात दुपारच्या सुमारास बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागावर भुरी व टमाट्यावर करपा रोगाची शक्यता बळावली. दुपारी पाच वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला हलक्याशा मध्यम पावसामुळे द्राक्ष बागावर भुरी व टमाट्यावर करपा रोगाची भीती व्यक्त केली जात आहे. तर गहू, हरभरा, मसुर, ज्वारी या रब्बी पिकांना हा पाऊस पोषक मानण्यात येतो आहे. दरम्यान काही भागात पावसामुळे उघड्यावर असलेला भुईमूग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धादल उडाली तर टमाटा उपबाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला दरम्यान बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण असून, विजेचा लंपडाव सुरू होता.
गोदाकाठ परिसरात वादळी पाऊस
कसबे सुकेणे : रात्री आठ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना वादळी पावसाने सूमारे दिड तास झोडपले. ठिकठिकाणी द्राक्षबांगाचे नुकसान झाले असून रात्री उशीरापर्यंत काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत होत्या. गोदाकाठच्या चांदोरी, सायखेडा, चाटोरी, भेंडाळी, शिंगवे,शिंपी टाकळी, या भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. बाणगंगा काठच्या सुकेणे, ओणे, दात्याणे जिव्हाळे, पिंपळस या भागातही हलक्या स्वरूपाच पाऊस झाला.(लोकमत चमू)देवपूर येथे वीजपडून महिला ठारवणी : दिंडोरी तालुक्यातील देवपूर येथे महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मिराबाई पुरुषोत्तम महाले (२८) ही महिला गवताचा भारा घरी घेऊन जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या जागीच ठार झाल्या.या परिसरात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा व जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अशा स्थितीत दिलीप रामचंद्र महाले यांच्या शेतजमिनतून रस्त्यावर जात असताना हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक मिलिंद खोडपे, के.टी. खैरनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Soybean maize crops with grapefruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.