सोयगावी दिंडीं
By Admin | Updated: July 10, 2014 01:01 IST2014-07-09T21:32:02+5:302014-07-10T01:01:53+5:30
सोयगावी दिंडीं

सोयगावी दिंडीं
मालेगाव : येथील सटाणा नाका, सोयगाव भागातील किलबिल शाळा व स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्ष वनिता पवार, राजेंद्र पवार, अशोक गुप्ता, संचालक मिलिंद पवार, राजेंद्र बागडे, सतीश मेहता, संचालक वंदना पवार उपस्थित होते. सदर दिंडीत विद्यार्थी देव विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम व वारकरी अशा विविध वेशभूषेत हजर होते. ही दिंडी शाळेपासून सटाणा नाका गजानन महाराज मंदिर, बोरसेनगर ते श्री हनुमान मंदिर अशी काढण्यात आली.