पावणेपाच लाख हेक्टरवर पेरण्या आटोेपल्या
By Admin | Updated: July 31, 2015 22:53 IST2015-07-31T22:52:17+5:302015-07-31T22:53:38+5:30
उघडिपीनंतर पावसाची हजेरी

पावणेपाच लाख हेक्टरवर पेरण्या आटोेपल्या
नाशिक : पावसाने गुरुवारी उघडीप घेतल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात अधून-मधून हलक्या व मध्यम सरींच्या पावसाची हजेरी कायम राहिली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, एकूण ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार ३४२ (७३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात अवघ्या ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, शुक्र्रवारी बहुतांश तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात जूनमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात दडी पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुबार पेरण्यांचे संकट ओढवले होते; मात्र शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील एखाद-दोन तालुके वगळता सर्वत्र दुबार पेरण्यांचे संकट टळल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. ३१) दिवसभरात पावसाने शहर व जिल्ह्यासह सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार३४२ हेक्टर (७३.५९) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
खरिपात भात व नागली पिके मिळून लाखाच्या वर पेरणी क्षेत्र आहे. तर सोयाबीन आणि मका पिकाच्याही क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पावसाची उघडीप व हजेरी पाहता बळीराजाची खरिपाची लगबग वाढली आहे.(प्रतिनिधी)