रब्बीच्या पेरण्या संथच अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या
By Admin | Updated: November 10, 2014 23:58 IST2014-11-10T23:57:03+5:302014-11-10T23:58:02+5:30
रब्बीच्या पेरण्या संथच अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या

रब्बीच्या पेरण्या संथच अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या
नाशिक : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी रब्बी हंगामाच्या पेरण्यांना अपेक्षित अशी गती आलेली नाही. रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी अवघ्या चार हजार ३५९ (तीन टक्के) हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्'ात रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यात सर्वाधिक क्षेत्र गहू व हरभरा पिकांचे आहे. रब्बी ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र १० हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी एक हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बी गव्हाचे क्षेत्र ७६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी एक हजार २११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच मका पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी प्रत्यक्ष ४२ हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. हरभरा पिकाचे ४० हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी प्रत्यक्ष एक हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यातही सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदि तालुक्यांत रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पूर्वाधात रब्बीच्या पेरण्या आटोपण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)