.शेतकरी गटांसाठी पेरणी, कडबा कुटी यंत्र

By Admin | Updated: June 7, 2014 00:31 IST2014-06-07T00:24:47+5:302014-06-07T00:31:32+5:30

रेडगाव खुर्द : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी गटासाठी बहुपीक पेरणी व कडबा कुटी यंत्र तसेच वैयिक्तक लाभाचे शेतीपूरक साहित्य मर्यादित अनुदान तत्त्वावर कृषी विभागाकडे उपलब्ध.

Sowing for Labor Groups, Kadab Kuti Yantra | .शेतकरी गटांसाठी पेरणी, कडबा कुटी यंत्र

.शेतकरी गटांसाठी पेरणी, कडबा कुटी यंत्र

रेडगाव खुर्द : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी गटासाठी बहुपीक पेरणी व कडबा कुटी यंत्र तसेच वैयिक्तक लाभाचे शेतीपूरक साहित्य मर्यादित अनुदान तत्त्वावर कृषी विभागाकडे उपलब्ध असून, गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.जी. व्यवहारे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तालुक्याला खेडूत कंपनीचे १९ बहुपीक पेरणी यंत्र व कडबा कुटी यंत्र ३६ प्राप्त झाले आहेत. याचा लाभ फक्त आत्माअंतर्गत स्थापन झालेला व क्रि याशील शेतकरी गटाना देण्यात येणार आहे. पेरणी यंत्रासाठी शेतकरी बचतगट हिस्सा तीस हजार व अनुदान पंधरा हजार रुपये तर कडबा कुटी यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदानावर शेतकरी गटास ९३५० रुपये भरावे लागतील. यासाठी अर्ज, गटाचा ठराव, १०० रुपयाच्या स्टॅँम्प पेपरवर हमीपत्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी आदि कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य व मूल्यमापन होऊन लाभ देण्यात येणार आहे. वैयिक्तक लाभाच्या योजनेत औषध फवारणीचा अस्पी कंपनीचा पिस्टन पंप (शेतकरी ८८०० रु पये), ज्योती कंपनीचा पिस्टन पंप (शेतकरी हिस्सा ४७०० रुपये), पाठीवरील १६ लिटर टाकीचा पंप ६३० रु पये शेतकरी हिस्सा भरून मिळणार आहे. तसेच दहा हजार रुपयात मोटारपंप, स्टार्टर, पाइप, केबल, पेटी आदि सर्व आवश्यक साहित्याचा लाभ उपलब्ध असून, त्यासाठी नवीन विहीर, त्या विहिरीवर वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज व अनामत भरल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. या शेती अवजारे व पूरक साहित्याच्या लाभासाठी कृषी कार्यालय, संबंधित मंडळाचे
सहाय्यक यांच्याशी संपर्क
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Sowing for Labor Groups, Kadab Kuti Yantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.