शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘त्या’ आवाजाने २० किलोमीटर परिसर हादरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:03 IST

ओझर (सुदर्शन सारडा) : २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये सुपरसॉनिक तंत्रज्ञान विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले.

ओझर (सुदर्शन सारडा) : २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये सुपरसॉनिक तंत्रज्ञान विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले. आजूबाजूच्या नागरिकांना एचएएल व्यवस्थापनामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.एचएएल कंपनीमध्ये लढाऊ विमाने तयार केली जातात. त्यामुळे या विमानांची चाचणी परिसरात होत असते. बऱ्याचदा नाशिकशहराच्या वेशीपर्यंत ही विमाने आकाशात घिरट्या घालताना नजरेस पडतात. मंगळवारी यातील एका सुपरसॉनिक विमानाची चाचणी ओझरमधील एचएएलच्या परिसरात पार पडली. यावेळी कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीत ऐकू आला. शहरातही काही भागात हा आवाज ऐकू आला.सध्या संचारबंदी सुरू असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. अनेकांची कामे घरून सुरू आहेत. यामध्ये संपर्काचे माध्यम केवळ सोशल मीडियात आणि फोन एवढेच उरले आहे. यादरम्यान, नाशिककरांना एकमेकांना संदेश, फोन स्वरूपात संपर्क करूनअचानक झालेल्या आवाजाबाबत विचारपूस केली. यावेळी फक्त आवाज ऐकू आला, कसला आला, कुठून आला कुणालाही माहिती नव्हते. दरम्यान याबाबत माहिती घेतली असता सुपरसॉनिक विमानांची चाचणी केल्यामुळे हा आवाज झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.------कसा होतो आवाज?एका आवाजाच्या वेगाला एक मॅक असे म्हटले जाते. एका मॅकच्या पुढे आवाजाचा वेग जातो तेव्हा वातावरणाला भेदत असताना त्याचा मोठा आवाज होतो. त्याला सुपरसोनिक बूम असे म्हणतात. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपटहून अधिक असतो. या आवाजाला बºयाचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानातून चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचिक माध्यमात प्रेशरवेव्हच्या रूपात प्रवास करीत असतो. हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करते. ४ पाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर म्हणजेच ४,७२४ फूट / से.पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जातात. यापेक्षाही अधिक हा आवाजाचा वेग असतो. त्यामुळे साहजिकच कानठळ्या बसवणारा आवाज होतो.

टॅग्स :Nashikनाशिक