नाशिक : कोरोना महासंकटामुळे महापालिकेच्या सर्व विषय समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या पूर्ववत घेण्यात येणार आहेत. मात्र, यंदा महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाइन पद्धतीने निवडणुक ा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सरसावले असून, सर्व प्रथम प्रभाग समित्यांचे सभापती निवडण्यात येणार आहेत त्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याबाबत महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि.१६) विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिकरोड या प्रभाग समित्या आहेत. मार्च महिन्यात या प्रभाग समित्यांची मुदत संपली. मात्र, त्याच महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना संकटामुळे लॉकडाऊन घोषित केले. राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेदेखील स्वतंत्र आदेश काढून कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका घेण्यास नकार दिला. तसेच अन्य निवडणुकादेखील स्थगित करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या कज्ज्यात अडकलेली स्थायी समिती मात्र योग्यवेळी सुटली. मात्र प्रभाग समित्यांच्या सभापतींची मुदत संपल्यानंतर नवीन सभापतींची निवड रखडली होती.याशिवाय महापालिकेतील शहर सुधार, महिला व बाल कल्याण, आरोग्य व वैद्यकीय सहाय समिती, विधी या समित्यांची मुदतदेखील संपली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका आता घेण्यासाठी राज्य शासन सरसावले आहे. राज्य शासनाने आता आॅनलाइन पद्धतीने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.सर्व प्रथम प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी नगरसचिव राजू कुटे यांनी आयुक्तांना पत्र दिल्यानंतर त्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सायंकाळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याच्या विनंतीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे.महापालिकेच्या सर्व समित्यांच्या सभापती निवडीसाठी पीठासन अधिकारी विभागीय आयुक्त किंवा त्यांनी प्राधीकृत केलेले अधिकारी असतात. त्यामुळे आता विभागीय आयुक्तच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.माघारीसाठी प्रत्यक्ष उमेदवाराचीच गरजमहापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे आॅनलाइन सभापती निवडणूक प्रथमच घोषित होणार आहे. मतदान आॅनलाइन होणार असले तरी अर्ज दाखल करणे आणि अन्य माघारीसाठी प्रत्यक्ष उमेदवाराचीच गरज असणार आहे. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारांना त्यामुळे प्रत्यक्ष प्रभाग समितीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे, तर दुसरीकडे मतदान करताना संपूर्ण प्रक्रियेचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे.यंदा भाजप अडचणीत?राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी एकत्र असून, त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आहे. नाशिक महापालिकेच्यापश्चिम प्रभाग समिती वगळता सर्व प्रभागांवर भाजपचे वर्चस्व आहे. पश्चिमप्रभाग समितीत गेल्यावेळी मनसेच्या अॅड. वैशाली भोसले तर त्यांच्यानंतर आता कॉँग्रेसच्या वत्सला खैरे सभापती होत्या. तथापि, गेल्या वर्षभरापासून भाजपअंतर्गत वाद आणि आता महापालिकेच्या निवडणुका दीड वर्षांवर असल्याने फाटाफूट होण्याची शक्यता आहे.
प्रभाग समित्यांच्या लवकरच आॅनलाइन निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:25 IST
कोरोना महासंकटामुळे महापालिकेच्या सर्व विषय समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या पूर्ववत घेण्यात येणार आहेत. मात्र, यंदा महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाइन पद्धतीने निवडणुक ा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सरसावले असून, सर्व प्रथम प्रभाग समित्यांचे सभापती निवडण्यात येणार आहेत त्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याबाबत महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि.१६) विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
प्रभाग समित्यांच्या लवकरच आॅनलाइन निवडणुका
ठळक मुद्देयंदा नवा प्रयोग : महापालिकेचे विभागीय आयुक्तांना पत्र