जन्मदात्रीने सोडलेल्या ‘सोनू’ला परिचारिकांमुळे जीवदान!

By Admin | Updated: April 5, 2017 18:31 IST2017-04-05T18:31:35+5:302017-04-05T18:31:35+5:30

बाळाचा आईप्रमाणे सांभाळ; ३२ दिवसांनंतर आधाराश्रमाकडे सुपूर्द

'Sonu' left for birthdate | जन्मदात्रीने सोडलेल्या ‘सोनू’ला परिचारिकांमुळे जीवदान!

जन्मदात्रीने सोडलेल्या ‘सोनू’ला परिचारिकांमुळे जीवदान!

नाशिक : मानसिक संतुलन बिघडलेली तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक वा पडीक जागेत वास्तव्य करणाऱ्या एका कुमारी मातेचे महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यात आले़ डॉक्टरांनी सिझरद्वारे आई व मुलगा या दोघांचेही प्राण वाचविले़; मात्र जन्मत:च बाळाचे वजन कमी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास एसएनसीयू युनिटमध्ये दाखल केल़े यानंतर अवघ्या तीन दिवसांत मुलास सोडून जन्मदात्री निघून गेली़ यानंतर तब्बल महिनाभराहून अधिक काळ आईप्रमाणे काळजी घेतलेल्या मुलास (सोनू) बुधवारी (दि़ ५) आधाराश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले़ याप्रसंगी एकीकडे सोनू इथून जाणार हे दु:ख तर दुसरीकडे त्यास जीवदान दिल्याचे समाधान असे दुहेरी भाव या युनिटमधील परिचारिकांच्या चेहऱ्यावर होते़

Web Title: 'Sonu' left for birthdate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.