सोनोशी सरपंचपदी ताई पोटकुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:28 IST2019-03-27T16:27:56+5:302019-03-27T16:28:23+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी ग्रुप ग्रामपंचायतीचा निकाल सोमवार दि.२५रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत निकालात सोनोशी सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या उमेदवार ताई दिलीप पोटकुले या २६९ मतांनी निवडून आल्या आहेत.

सोनोशी येथील विजयी नविनर्वाचित सरपंच ताई पोटकुले व दिलीप पोटकुले यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ.
ठळक मुद्दे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दत्तू संतु पेढेकर व माधव घाणे या दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने इगतपुरी तहसीलदार कार्यालयात दोन्ही उमेदवारां समोर निर्णायक चीठ्ठी उघडून दत्तू पेढेकर हा तरु ण निर्णायक निकालात निवडून आला आहे.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी ग्रुप ग्रामपंचायतीचा निकाल सोमवार दि.२५रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत निकालात सोनोशी सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या उमेदवार ताई दिलीप पोटकुले या २६९ मतांनी निवडून आल्या आहेत.तसेचतसेच नंदू गणपत भांगरे, उल्हास गोविंद गोडे,मंदाबाई पांडुरंग धोंगडे,गंगुबाई लक्ष्मण धोंगडे, लीलाबाई गणेश गोडे असे विजयी झालेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत.
...