सोंगांनी जागवली रात्र

By Admin | Updated: May 15, 2014 23:54 IST2014-05-15T23:45:51+5:302014-05-15T23:54:01+5:30

श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ

Songs awake night | सोंगांनी जागवली रात्र

सोंगांनी जागवली रात्र

श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ
नाशिक : श्रींचा अभिषेक, महापूजा, पालखी मिरवणुकीने श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी रात्री दशावतारी सोंगांनी रात्र जागवली़
रविवार पेठ येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत आज सायंकाळी महापूजा तसेच अभिषेक संजीवनी व जयवंत मगर तसेच उषा व सुभाष परदेशी या उभयंतांच्या हस्ते करण्यात आले़ सायंकाळी साडेपाच वाजता म्हसोबा मंदिरापासून श्रींच्या पारंपरिक पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला़ पारंपरिक ढोल-ताशे ही चर्मवाद्ये व सनईच्या सुरात फु लांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली़ यामध्ये दांडप˜ा, सुराढे चक्र याच्या कसरती शिवबाल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केले़ ही मिरवणूक रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, शनी गल्ली मार्गे रविवार पेठेत दाखल होऊन मिरवणुकीचा समारोप झाला़ यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले़
रात्री साडेआठ वाजता येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या दशावतारी सोंगांना प्रारंभ झाला़ यामध्ये प्रथम गणपती-शारदा हे सोंग आले. यानंतर सुग्रीव-बाली, कच्छ-मच्छ, एकादशी, खंडेराव, भैरवनाथ, राम, लक्ष्मण, सीता, हनुमाण व रावण, भोळा शंकर, राधा- श्रीकृष्ण, हिडींबा, वराह, चंद्र-सूर्य, म्हसोबा महाराज व देवी अशा सोंगांनी पारंपरिक हलगी, सनई व इतर वाद्यांच्या साथीने संपूर्ण रात्र जागवली़
आज सुरू झालेला यात्रा महोत्सव चार दिवस चालणार आहे़ शुक्रवारी सायंकाळी पूजा, तीर्थप्रसाद तसेच मल्लखांबाची प्रात्यक्षिके होणार आहेत़ शनिवारी महाराष्ट्र गीते, तर रविवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे़ महाप्रसादाने महोत्सवाचा समारोप होणार आहे़
फ ोटो क्रमांक - 15 पीएचएम116
रविवार पेठ येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त महापूजा करताना भाविक .

Web Title: Songs awake night