सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

By Admin | Updated: May 14, 2017 23:06 IST2017-05-14T23:06:56+5:302017-05-14T23:06:56+5:30

भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Sonashakhali thieves in 'Surat' | सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

नाशिक : भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या ‘श्रीमंत’ चोरट्यांची परिसरातून रविवारी (दि.१४) ‘वरात’ काढली.
पादचारी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हिसकावून आपले ‘भाग्य’ उजळविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे (वय २२, रा. अश्वमेधनगर) याचा पंचवटी पोलिसांनी जेव्हा माग काढला तेव्हा त्याची तीन मजली आलिशान इमारत बघून पोलीसही चक्रावले. जेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी जेव्हा त्याच्या इमारतीच्या तळमजल्यावरील उंबरा ओलांडला आणि घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले तेव्हा घरात असलेल्या चैनीच्या महागड्या ब्रॅण्डेड वस्तू बघून पोलीस अवाक् झाले. घरात कोणीही कमावते नसल्याने आलिशान इमारतीच्या या ‘श्रीमंत’ सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद करून गुन्ह्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारा त्याचा साथीदार विलास राजू मिरजकरच्या (वय २७, रा.लक्ष्मणनगर) मुसक्या आवळल्या. या दोघांचीही पोलिसांनी ‘वरात’ काढून परिसरातील रहिवाशांसमोर पितळ उघडे पाडले. या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Sonashakhali thieves in 'Surat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.