शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; शिवाजीचौकात चेनस्रॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 19:02 IST

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौकात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना

ठळक मुद्देसहा ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळीपादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनाही थांबल्या नसून दररोज विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यासंबंधी गुन्हे दाखल होतात. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौकात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना उघडकस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण प्रकाश कडवे (२०, रा. जुने सिडको) या रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडल्या असता, सुंदरबन कॉलनी रस्त्यावरून जात होत्या. यावेळी शिवाजी चौकाकडून महामार्गाच्या दिशेने एका पल्सर दुचाकीवरून दोघे अज्ञात चोरट्यांनी येऊन कडवे यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चोरटे सक्रिय : भर वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी लंपासनाशिक : शहरातून दुचाकी चोरीचा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. विविध उपनगरांमध्ये सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. आडगाव, नवीन सीबीएस परिसरातून दोन दुचाकी अज्ञात दुचाकी चोरांनी लंपास केल्या आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून नंदू शिवराम दरेकर (४०, कोणार्कनगर) यांच्या मालकीची हीरो होंडा पॅशन (एमएच१५, सीझेड ६६९१) चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरी घटना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन सीबीएस बसस्थानकाच्या परिसरात घडली. अशोकस्तंभ येथून होंडा कंपनीची दुचाकी (एमएच१५, बीएफ ८१५५) चोरट्यांनी लंपास के ली. याप्रकरणी मोहन रणखांबे (५८, ज्ञानगंगा सोसा. पोकार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच शहरातून दुचाकी चोरीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :GoldसोनंPoliceपोलिसcidcoसिडको