सोनसाखळी चोरट्यास अटक

By Admin | Updated: October 13, 2015 00:17 IST2015-10-13T00:16:09+5:302015-10-13T00:17:14+5:30

सोनसाखळी चोरट्यास अटक

Sonasakhali thieves arrested | सोनसाखळी चोरट्यास अटक

सोनसाखळी चोरट्यास अटक

नाशिक : उपनगर परिसरात महिलांचे मंगळसूत्र खेचणाऱ्या भुसावळमधील या संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली असून, साडेसहा तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे़
पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट तीनला महिलांच्या सोनसाखळ्या खेचणारा संशयित बबलू बादशहा उर्फ फिरोज अली इराणी (३२, भुसावळ) याच्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती़ त्यावरून सापळा रचून भुसावळ येथून त्यास अटक करण्यात आली़ त्याची कसून चौकशी केली असता त्याने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, चोरी केलेले साडेसहा तोळे सोने काढून दिले़ दरम्यान, त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sonasakhali thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.