सोनसाखळी अन्् दुचाकीचोरी खुलेआम
By Admin | Updated: October 5, 2015 23:42 IST2015-10-05T23:42:03+5:302015-10-05T23:42:59+5:30
हतबलता : वाहनचालकांच्या तपासणीचा फार्स

सोनसाखळी अन्् दुचाकीचोरी खुलेआम
नाशिक : शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खुलेआम सोनसाखळी व दुचाकीचोरीच्या घटना घडत असून, पोलिसांना मात्र गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिकरोड, सीबीएस, अंबड, गंगापूररोड आदि परिसरांत तीन ते चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच सोनसाखळी पळविण्याच्याही घटना नित्यनेमाने घडत असून, चोरट्यांकडून घर, दुकाने फोडण्याचेही उद्योग केले जात आहे. एकूणच चोऱ्यांच्या घटनांनी नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण व्यक्त केले जात आहे.
शहरातील गुन्हेगारांना गळाला लावण्यासाठी पोलिसांच्या वतीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच शहर वाहतूक शाखेकडूनही नाकाबंदी करण्यात येत असून, वाहनांची तपासणी केली जात आहे. मात्र अद्याप एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याउलट नाकाबंदीचा त्रास सकाळच्या सुमारास कामावर हजर होणाऱ्या नोकरदारांना तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.