वृद्धेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली
By Admin | Updated: June 12, 2014 01:03 IST2014-06-12T00:55:56+5:302014-06-12T01:03:15+5:30
वृद्धेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली

वृद्धेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली
पंचवटी : पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्धेची ५० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी पळवल्याचा प्रकार आडगाव परिसरात घडला़
याबाबत यशोदा भीमराव जगजाप (६२), रा. श्रीरामनगर, आडगाव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ त्या ओझर येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी जत्रा हॉटेलजवळून पायी जात असताना सदर घटना घडली. (वार्ताहर)