सोमपूर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा फडशा
By Admin | Updated: October 6, 2015 22:24 IST2015-10-06T22:21:52+5:302015-10-06T22:24:13+5:30
सोमपूर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा फडशा

सोमपूर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा फडशा
जायखेडा : परिसरातील सोमपूर शिवारात रात्री शेतात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्यांचा फडशा पाडला. यामुळे शेतकऱ्यांसह परिसरात घबराट पसरली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने घबराटीचे वातावरण आहे. सोमपूर शिवारात लतीफ हाजी अब्दुल मजीद शेख यांचे शेत असूून, शेळ्यांसाठी पत्र्यांचे शेड बनविलेले आहे. बिबट्याने रात्रीच्या सुमारास छतावरील पत्र्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उडी मारून शेडमध्ये बांधलेल्या बोेकड व दोन शेळ्यांवर हल्ला केला. त्यात दोन शेळ्या व एका बोकडाचा समावेश आहे. सकाळी शेतमजुराने शेळ्यांना चारा टाकण्यासाठी शेडचा दरवाजा उघडताच बिबट्याने उडी मारून धूम ठोकली. क्षणात तो पिकांमध्ये गडप झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पिंंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.