शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

नाशिकचे सोमेश्वर मंदीर : १०८ बाल तबलावादकांचा ‘ताल नम:शिवाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:52 IST

सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे.

ठळक मुद्दे सकाळी नऊ वाजेपासून भाविकांना महाप्रसादाचे वाटप तबालावादकांनी सामुहिकरित्या तबलावादन सादर करत भाविकांचे लक्ष वेधलेसोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त नाशिक येथील सोमेश्वर मंदीरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १०८ बाल तबलावादकांनी सामुहिकरित्या तबलावादन करत ‘ताल नम:शिवाय’ सादर केला.सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानावर नियुक्त करण्यात आलेल्या नव्या विश्वस्त मंडळाची पहिली महाशिवरात्री असून मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे. सकाळी पाच वाजता मंदिरात पारंपरिक पध्दतीने अध्यक्ष प्रमोद गोरे, गोकुळ पाटील, अ‍ॅड. बापुसाहेब गायकर, भिमराव पाटील आदि विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महाभिषेकाचा सोहळा पार पडला.

त्यानंतर १०८ बाल तबलावादकांनी एकत्र येऊन तबल्यावर नम:शिवायचा ताल धरला. सुमारे तासभर तबालावादकांनी सामुहिकरित्या तबलावादन सादर क रत भाविकांचे लक्ष वेधले. सकाळी नऊ वाजेपासून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार असल्याचे मंडळाने सांगितले. संध्याकाळी सात वाजता मंदिरात महापूजेला पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित राहणार असल्याचे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., धर्मदाय आयुक्त प्रदीप घुगे, उपधर्मादाय आयुक्त दिप्ती कोळपकर हेदेखील महापूजेत सहभागी होणार आहे. दुपारी विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते पुजा पार पडली.संध्याकाळी नंदकुमार देशपांडे प्रस्तुत ‘स्वरगंगा’ हा मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम मंदिराच्या आवारात होणार आहे.

टॅग्स :templeमंदिरNashikनाशिकMahashivratriमहाशिवरात्री