लाखोंच्या घरफोडीची आठ दिवसांत उकल
By Admin | Updated: June 24, 2015 01:29 IST2015-06-24T01:28:56+5:302015-06-24T01:29:18+5:30
लाखोंच्या घरफोडीची आठ दिवसांत उकल

लाखोंच्या घरफोडीची आठ दिवसांत उकल
नाशिकरोड : गंगापूर रोडवरील रामेश्वरनगरमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या घरफोडीच्या गुन्'ाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोन व तीनला यश आले आहे़ विशेष म्हणजे घरफोडीतील चोरी गेलेल्या दीड किलो सोन्यापैकी काही सोने व रोकड संशयितांकडून जप्त करण्यात आल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान यामध्ये पकडलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ घरफोडीचा अत्यंत कमी कालावधीत छडा लावण्याचा व मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जमा करण्याची बहुधा आयुक्तालयातील ही पहिलीच घटना असावी़
गंगापूर रोडवरील रामेश्वरनगरमधील यमुनाकृपा बंगल्यातील नीरव दिलीप पंजवानी हे शनिवारी (दि़१३) कामानिमित्त बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून साठ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती़ या प्रकारणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़; मात्र घटनेनंतर पंजवानी यांचे कुटुंबीय परतल्यानंतर घरातील तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ पोलिसांत त्यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार गुन्'ाची व्याप्ती पाहता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला़