वडजी येथे बस सुरू झाल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:53 IST2019-06-18T21:52:37+5:302019-06-18T21:53:15+5:30
येवला : येवला-वडजी बस चालू व्हावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी अखषर पुर्णत्वास येवून ती सुरु करण्यात आल्याने वडजी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विभागीय राज्य परिवहन मंडळ नाशिक येथील कार्यालयात बस चालू करणेबाबतचा पाठपुरावा केला. त्यामुळे ही बस सुरु करण्यात आली.

येवला-वडजी बस आगमन प्रसंगी वाहक व चालक यांचा सत्कार करतांना सरपंच जगदीश राऊत.
ठळक मुद्देबस वाहक व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत अन् सत्कार केला.
येवला : येवला-वडजी बस चालू व्हावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी अखषर पुर्णत्वास येवून ती सुरु करण्यात आल्याने वडजी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
विभागीय राज्य परिवहन मंडळ नाशिक येथील कार्यालयात बस चालू करणेबाबतचा पाठपुरावा केला. त्यामुळे ही बस सुरु करण्यात आली. वडजी ता. वैजापूर येथील ग्रामस्थांना येवला व शालेय विद्यार्थ्यांना राहाडी विद्यालयात जाण्या-येण्यासाठी मोठी सोय यामुळे झाली आहे. मंगळवारी (दि.१८) वडजी गावात बस आल्यावर सरपंच जगदीश राऊत, उपसरपंच नबाब शेख, प्राचार्य पैठणकर, शेख, वाघ यांनी बसचे पूजन करण्यात आले. बस वाहक व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत अन् सत्कार केला.