घनकचरा विलगीकरणाचे नियोजन
By Admin | Updated: June 23, 2017 00:28 IST2017-06-23T00:26:26+5:302017-06-23T00:28:32+5:30
नाशिक : महापालिकेने शहरात घनकचरा विलगीकरणाबरोबरच स्वच्छताविषयक जागृती करण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन केले आहे.

घनकचरा विलगीकरणाचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेने शहरात घनकचरा विलगीकरणाबरोबरच स्वच्छताविषयक जागृती करण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन केले असून, आॅगस्टपर्यंतच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
महापालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी प्रभावी मोहीम सुरू केली आहे. घंटागाडी ठेकेदारांसह विविध संस्था-संघटनांमार्फत डसबिन पुरविण्याची कार्यवाही केली जात आहे. याशिवाय, महापालिकेने जून ते आॅगस्ट असे प्रभागनिहाय नियोजन करत त्याची अंमलबजावणी सुरूही केली आहे. त्यात जून महिन्यात सातपूर विभागातील प्रभाग ९, पूर्वमधील प्रभाग १५, पश्चिममधील प्रभाग ७, सिडकोतील प्रभाग २४ तर नाशिकरोडमधील प्रभाग १७ व १८ अशा एकूण ८ प्रभागांचा समावेश आहे.
जुलै महिन्यात सातपूर विभागातील प्रभाग ८ व १०, पूर्वमधील प्रभाग १६ व २३, पश्चिममधील प्रभाग १२, सिडकोतील प्रभाग २५ व २७, पंचवटीतील प्रभाग ३ व ६ तर नाशिकरोडमधील प्रभाग १९ आणि २० अशा एकूण ११ प्रभागांचा समावेश आहे. आॅगस्ट महिन्यात सातपूर विभागातील प्रभाग ११ व २६, पूर्वमधील ३० व १४, पश्चिममधील प्रभाग १३, सिडकोतील प्रभाग २८, २९ व ३१, पंचवटीतील प्रभाग ४ व ५ आणि नाशिकरोडमधील प्रभाग २९ व २२ या प्रभागांचा समावेश आहे. याठिकाणी घनकचरा विलगीकरणासह स्वच्छताविषयक शंभर टक्के मोहीम राबविली जाणार आहे.