शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुळवंच येथे घनकचरा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:00 IST

गुळवंच येथे स्वच्छ भारत अभियान कक्ष अंतर्गत गुळवंच विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.

सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथे स्वच्छ भारत अभियान कक्ष अंतर्गत गुळवंच विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान कक्ष’ अंतर्गत नुकतेच गुळवंच येथील एस. एस. एस. विद्यालयात प्रात्यक्षिक व दृकश्राव्य माध्यमांच्या आधारे शालेय विद्यार्थी व शिक्षकांना स्वच्छतेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शिवहर बेलगुरे यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींच्या सहाय्याने घनकचरा व्यवस्थापन, बायोगॅस निर्मिती, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकचे निर्मुलन, झीरो गार्बेज, झीरो डिम्पंग, शाळा परिसर स्वच्छता व ग्रामस्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करतेवेळी शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या कल्पना जाणून घेतल्या व सर्व शिक्षक व विद्यार्थी यापुढे ‘स्वच्छ भारत अभियान कक्ष’ या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता अभियान, निरोगी आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी कटीबद्ध राहू असे मुख्याध्यापक एम. डी. काळे यांनी आश्वासन दिले.यावेळी सरपंच केशव कांगणे, माजी सरपंच भाऊदास सिरसाट, वृषाली सानप, चंद्रकांत घरटे, शरद केदार, भास्कर रेवगडे, दत्तात्रय रेवगडे, संजय सानप, छाया सांगळे, रवींद्र कांगणे, सुरेखा जगताप, संदीप धूम, ललीत रत्नाकर, नवनाथ सानप, मारुती सानप व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाHealthआरोग्य